तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत. प्रशासक कालावधीमध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यावतीने प्रशासक असलेल्या आयुक्तांना अर्थसंकल्प सादर केला जात असे. परंतु आता महापालिका स्थापन होवून स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून तीन वर्षानंतर स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत.


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी इक्बालसिंह चहल यांनी तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर सन २०२३ पासून २०२५ पर्यंत सलग तीन वर्षे महापालिका प्रशासकांच्यावतीने अर्थसंकल्प मांडला जात आहे. अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्यावतीने प्रशासकांना अर्थसंकल्प सादर केला जात होता. त्यामुळे आता महापालिका अस्तित्वात आल्यामुळे आता तीन वर्षांनंतर प्रथमच शिक्षण समिती अध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना आयुक्तांच्यावतीने अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.


मागील अर्थसंकल्प हा ७४ हजार ४०० कोटी रुपयांचा होता. परंतु आता त्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्प मार्गी लागल्यामुळे आता या अर्थसंकल्पाचा आकार वाढला जावून तब्बल दहा हजार कोटींनी याचा आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८४ ते ८५ हजार कोटी रुपयांच्या घरात महापालिका अर्थसंकल्पाचा आकार वाढला जाण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील

Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता