Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरातील ३००० हून अधिक सापांच्या प्रजातींपैकी अवघे १० टक्के म्हणजे ३०० हून कमी प्रजाती विषारी असतात. ताइपनसारखे काही साप इतके विषारी असतात की त्यांच्या एका दंशाने १०० लोकांचा जीव जाऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, सर्पदंशाने दरवर्षी १,४०,००० लोकांचा मृत्यू होतो. या डेटावरून समजून घेऊया सापाच्या विषापासून औषध बनवणं किती महत्त्वाचं आहे.

अलिकडेच, गुजरातमधील धरमपूर येथील सर्प संशोधन संस्था औषधे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे चर्चेत आली आहे. गुजरात सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या या संस्थेने अलीकडेच कोब्रा, कॉमन क्रेट आणि रसेल वाइपर सारख्या प्रजातींमधून चांगल्या दर्जाच्या विषाच्या ई-लिलावात खूपच जास्त किंमत मिळवली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावरुन लक्षात येतं की सापाचं विष किती मौल्यवान असतं. सापांमध्ये हे विष कुठं तयार होतं आणि ते कसं काढलं जातं हे पाहूया.

https://x.com/PTI_News/status/2025640160248172547?s=20

सापाचं विष कसं काढलं जातं?


साप चावल्याने मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होता आणि हेच पाहून अँटीडॉट म्हणजे विषविरोधी औषध तयार करण्याची गरज वाढली आहे. Let's Talk Science च्या अनुसार, सापाच्या डोक्याच्या मागच्या भागातील ग्रंथींमध्ये विष तयार होतं आणि साप चावल्यानंतर विष समोरच्याच्या शरीरात प्रवेश करतं. जेव्हा विषविरोधी औषध तयार केलं जातं, त्यावेळी सापाचं विष अत्यंत सावधानतेने काढलं जातं. विष काढण्याच्या प्रक्रियेत सापाला कोणत्याही भांड्याला चावायला दिलं जातं. मग त्या भांड्यात सोडलेलं विष जमा केलं जातं. दुसऱ्या पद्धतीत सापाच्या तोंडातील विष फेकणाऱ्या जागेतून विष एकत्र केलं जातं.

सोन्यापेक्षा सापाचं विष किती महाग असतं?


फ्लोरिडा विश्वविद्यापीठानुसार, विषाचं प्रमाण सापाच्या विविध प्रजातींमध्ये वेगवेगळं असतं. जे १ मिलीग्रॅमपासून ८५० मिलीग्रॅम किंवा त्याहून अधिक असतं. काही सापांचं विष वेदनाशामक म्हणून आणि रक्त गोठण्यासाठी वापरले जाते.

किंग कोब्राचं विष प्रोटीनयुक्त असतं. दीर्घकालीन वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या विषाचा वापर केला जातो. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे विष असल्याचं म्हटलं जातं, ज्याची किंमत प्रति गॅलन १.५ लाख डॉलर आहे. स्मिथसोनियन मासिकाच्या मते, अँटीवेनमच्या एका डोसची किंमत १४,००० डॉलरपर्यंत पर्यंत असू शकते.

आता कोरल आर ब्राउन सापांच्या विषाचा वापर अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीवेनमच्या औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्याच्या १ ग्रॅमची किंमत ४ हजार डॉलरपर्यंत असू शकते. काही विषाची किंमत एका ग्रॅममागे १२-१३ हजार डॉलरपर्यंत असू शकते. आता या विषाच्या किमतीची तुलना सोन्याशी केली तर विष कित्येक पटीने महाग आहे.

१ ग्रॅम सोन्याची किंमत सध्या १६६-१६७ डॉलर आहे. म्हणजेच १३ हजार डॉलरमध्ये तब्बल ७८-७९ ग्रॅम सोनं खरेदी करता येईल. हे २४ कॅरेट सोन्याचा भाव आहे.

 

 
Comments
Add Comment

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र