Bigg Boss Marathi Season 6 Sachin Kumawat: 'बिग बॉस'मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर खान्देश किंग सचिन कुमावतची पहिली पोस्ट समोर; काय म्हणाला?

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझनची रंगत वाढत चालली आहे. या सीझनमधील स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. अशातच दर आठवड्याला स्पर्धेत मोठा ट्वि्स्ट पाहायला मिळतो. अशातच सहाव्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घराचा निरोप कोण घेणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. पण सहाव्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशननं अनेकांना धक्का बसला. घरातला 'चांगला माणूस' म्हणजेच खान्देश किंग सचिन कुमावत घराबाहेर पडला. सचिन एलिमिनेट होणार हे पाहून घरातील इतर स्पर्धकांच्या अश्रुंचा बांध फुटला. सचिन कुमावतचं एलिमिनेशन घरातील अनेकांसाठी धक्का होता.


खान्देश किंग सचिन कुमावत घराबाहेर येताच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बिग बॉस मराठीमधला सहा आठवड्यांचा प्रवास माझ्यासाठी खास होता, असं सचिननं म्हटलं आहे. तसेच, त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या प्रवासात दिलेल्या प्रेमासाठी त्यानं मनापासून धन्यवाद म्हटलं आहे.





सचिनने काय पोस्ट केली?


खान्देश किंग म्हणून प्रसिद्ध असलेला गायक सचिन कुमावतनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. सचिन कुमावतनं लिहिलंय की, "बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खान्देशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खास होता. एक कलाकार म्हणून ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकलो, तेही कोणाचाही द्वेष न करता, प्रामाणिकपणे खेळत. या संपूर्ण प्रवासात दिलेल्या तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद...".


सचिन कुमावतनं ही पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, "महाराष्ट्रानं दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद... तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या... लवकरच पुन्हा भेटू..."


दरम्यान, अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. सचिन बिग बॉसच्या घरात म्हणावा तितका रमला नाही, असं म्हटलं तरी चालेल. मूळचा साध्यासुध्या स्वभावाचा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात कट-कारस्थान रचण्यात आणि खेळ समजण्यात कुठेतरी कमी पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण, घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला.

Comments
Add Comment

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

'Lock Upp 2' : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉकअप २ (Lock Upp) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला