अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठीत केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.


सदस्य मनीषा कायंदे यांनी अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव मधील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही सहभाग घेतला.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ही संस्था विना अनुदानित असल्याने या संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही. मात्र या संस्थेविरुद्ध संस्थेतील माजी विद्यार्थ्याकडून शुल्काबाबतच्या प्राप्त तक्रारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, संघटना, संस्थेचे माजी कर्मचारी यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गठित समितीमार्फत सखोल चौकशी करून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल.


अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न असल्याने याबाबत संस्थेच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्रिस्तरीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीचे कामकाज सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला