Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले.


‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित होते.


भारताने एआय क्षेत्रात केलेली प्रगती दिल्ली येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये अधोरेखित झाली आहे. भारताच्या एआय क्षेत्रातील कामगिरीचे जागतिक स्तरावर कौतुक झाले असून आयएमएफच्या प्रमुखांनी भारताची प्रगती अतिशय उल्लेखनीय असल्याचे नमूद केले आहे. यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एआय फॉर ॲग्री परिषदेचे केलेले यशस्वी आयोजन नक्कीच कौतुकास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाची प्रशंसा केली.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआयला नैतिकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वसमावेशकतेशी जोडले आहे. कृषी क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर सुरू असून पीक उत्पादनाचा अंदाज, योग्य पिकांची निवड, हवामान अंदाज, रोगांचे लवकर निदान आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. देशातील विविध भागांतील शेतकऱ्यांसाठी २२ भारतीय भाषांमध्ये एआय आधारित तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


शेतकऱ्यांसाठी ‘एआय ओपन स्टॉक फॉर फार्मर्स’ तसेच कृषी क्षेत्रातील सर्व एआय करिता एकत्रित व्यासपीठ उभारण्यात येत आहे. सॉइल हेल्थ कार्ड, स्वामित्व योजना, ड्रोन मॅपिंग, हवामान अंदाजासाठी स्वतंत्र मिशन आणि जैवतंत्रज्ञान धोरणाद्वारे शेती अधिक सक्षम केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत