राज्यात गुंतवणुकीसाठी इव्हॉल्व कंपनीचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

मुंबई : ऑस्ट्रेलियाची इव्हॉल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवी मुंबई, पुणे, आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीतून जवळपास एक हजार ७५ लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी कंपनीने राज्य शासनसोबत करार केल्याची माहिती उद्योग विभागामार्फत देण्यात आली. या करारांचे आदान प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे उद्योग विभाग व कंपनीमध्ये करण्यात आले.


यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, इव्हॉल्व कंपनीचे कंट्री हेड आदित्य शर्मा, इव्हॉल्व कंपनीच्या भारतीय सहभागीदार असलेल्या एम्प्रेसेंड उद्योग समूहाचे अध्यक्ष रुस्तम केरावाला, वरूण गुप्ता, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या