लाचखोरी प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल - नरहरी झिरवाळ

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात परवान्यांच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या गंभीर प्रकारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, "हा प्रकार अत्यंत गलिच्छ असून या प्रकरणातील सत्य लवकरच चौकशीतून बाहेर येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


औषध विक्रेत्यांच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात. या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, या प्रक्रियेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खासगी सचिव (पीए) रामदास गाडे आणि लिपिक डेरिंगे हे स्वतः अपील ऐकत असल्याचे व परवाना पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.


यावर भाष्य करताना झिरवळ म्हणाले की, "ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले, त्यांनी ते शत्रू म्हणून केले नसून कामात होणाऱ्या त्रासामुळे सत्य बाहेर आणले आहे. अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो, मात्र आता सखोल चौकशी सुरू असून 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल."


कर्मचाऱ्यांना दिली तंबी


झिरवळ म्हणाले, "राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचे दुःख असताना, माझ्या दालनात असा प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट तंबी दिली आहे की, पारदर्शक पद्धतीने काम करा. कुठेही प्रशासनाला कलंक लागेल असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही". दरम्यान, सुनेत्रा वहिनींना दादांच्या (अजित पवार) जागी योग्य स्थान मिळावे, ही सर्वांचीच भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Nashik : कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गिरीश महाजन

Nashik : कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या