Sharad Pawar: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी रुग्णालयात दाखल

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रकृती खालावल्याचे समोर येत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा पवार यांची तब्येत काहीशी बिघडली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवार नुकतेच पाच दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते. परंतु, आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या छातीत कंजेशन झाल्यामुळे पवारांना बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी होते. पण, आता त्यांना पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

Comments

Vinayak Degwekar    February 22, 2026 07:42 PM

Ge will be alright if assured seat which he never deserved in RS We have his moles in BJP who will ensure the same

Add Comment

Bread Prices Rise In Mumbai : मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री; ब्रेडच्या दरात तब्बल ५ रुपयांची वाढ!

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी एक मोठी कात्री लागली आहे. आधीच दूध आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या

Pune Bastian Club : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील 'बॅस्टियन' क्लबमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील नाईटलाइफ (Video Viral On Social Media) आणि पब संस्कृती पुन्हा एकदा एका मोठ्या

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि