महाविकास आघाडीच्या बैठकीवर शरद पवार गटाचा बहिष्कार - विरोधी पक्षांत विसंवाद; अधिवेशनापूर्वीच ‘मविआ’चा संसार विस्कटला?

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडीतील विसंवाद उघडपणे समोर आला आहे. ‘शिवालय’ या उबाठा गटाच्या कार्यालयात रविवारी झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी बहिष्कार घातला.


सत्ताधारी महायुतीला विधिमंडळात कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली खरी; मात्र, शरद पवार गटाच्या अनुपस्थितीचीच अधिक चर्चा रंगली. यामागे राज्यसभा निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा आहे. उबाठा गटाने आपले संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत या जागेवर हक्क सांगितला आहे, तर काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाबाबत सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पवारांच्या शिलेदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.


अधिवेशनापूर्वीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेलाही शरद पवार गटाने अनुपस्थिती दर्शवली. विरोधी पक्ष आधीच अस्थीपंजर झालेला असताना, या बैठकीकडे विरोधकांच्या अस्तित्वाची चाचणी म्हणून पाहिले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) गैरहजेरीमुळे उबाठा गट आणि काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.



‘मविआ’च्या राजकीय जहाजाला गळती


एकंदरीत, ‘मविआ’ नावाच्या राजकीय जहाजाला गळती लागल्याची चिन्हे दिसत असून, प्रत्येक घटक पक्ष आपापले राजकीय गणित जुळवण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. मात्र, या सगळ्यात विखुरलेल्या विरोधकांची विधिमंडळातील भूमिका नेमकी काय असणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने

Gel Nail Polish Side Effects : युरोप, ब्रिटनमध्ये बंदी असलेला 'हा' धोकादायक केमिकल भारतीय जेल नेलपॉलिशमध्ये अद्याप सुरूच! जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : नेल आर्ट (Nail Art) आणि जेल मॅनिक्युअरचा (gel manicure Trend) ट्रेंड सध्या जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढला

Malad Bank Theft : बँक फोडली, पण कॅश लॉकरपर्यंत पोहोचण्याआधीच पकडला; मालाडमध्ये २४ तासांत आरोपीला बेड्या

मुंबई : मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरातील एका बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, बांगूर