सावध व्हा! जुना Google Chrome युजर्सना हॅकिंगचा धोका ? सीईआरटी-इंडिया कडून सतर्कतेचा इशारा

भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक ( सीईआरटी-इंडिया) ने देशातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. २० फेब्रुवारी २०२६ रोजी CIVN-2026-0096 या अ‍ॅडव्हायजरी अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या इशाऱ्यात गुगल क्रोम डेस्कटॉप वापरकर्त्यांना गंभीर सुरक्षात्मक त्रुटींविषयी सतर्क करण्यात आले आहे. या मध्ये जुन्या व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षात्मक त्रुटी आढळल्या असून युजर्सना हॅकिंगचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


सीईआरटी-इंडियाच्या माहितीनुसार, विंडोज आणि मॅकओएस प्रणालीवर 145.0.7632.109/110 पेक्षा जुन्या आवृत्तीचा क्रोम वापरणारे तसेच लिनक्स प्रणालीवर 144.0.7559.109 पेक्षा आधीच्या आवृत्तीचा वापर करणारे युजर्स धोक्याच्या कक्षेत येतात. ब्राउझर अपडेट नसेल तर केवळ एखादे घातक वेबपेज उघडल्यानेही संगणकावर परिणाम होऊ शकतो. यासाठी संशयास्पद फाइल डाउनलोड करण्याची किंवा कोणतीही स्वतंत्र कृती करण्याची गरज नसून, हॅकर दूरस्थ पद्धतीने चुकीचा कोड चालवू शकतात.


सुरक्षा विश्लेषकांनी क्रोमच्या अंतर्गत रचनेतील त्रुटी शोधून काढल्या आहेत. PDF आणि मीडिया कंटेंट हाताळणाऱ्या घटकांमध्ये ‘हीप बफर ओव्हरफ्लो’ प्रकारच्या त्रुटी आढळल्या असून, JavaScript प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या V8 इंजिनमध्ये ‘इंटीजर ओव्हरफ्लो’ समस्या असल्याचे समोर आले आहे. या त्रुटींचा गैरफायदा घेतल्यास हॅकर संगणकाची मेमरी बिघडवू शकतात, अनधिकृत आदेश चालवू शकतात किंवा डिनायल-ऑफ-सर्व्हिस हल्ल्याद्वारे प्रणाली क्रॅश करू शकतात.


ही समस्या केवळ आयटी क्षेत्रापुरती मर्यादित नसून विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, फ्रीलान्सर आणि रोजच्या कामासाठी क्रोम वापरणारे सर्वसामान्य नागरिकही धोक्यात येऊ शकतात. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या त्रुटींवर उपाय उपलब्ध आहे. क्रोमच्या नव्या स्टेबल अपडेटमध्ये आवश्यक पॅच देण्यात आले आहेत.


सीईआरटी-इंडियाने सर्व वापरकर्त्यांना ब्राउझरचे अपडेट मॅन्युअली तपासण्याचा आणि ब्राउझर रीस्टार्ट करून नवीन आवृत्ती तत्काळ इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे. वेळेवर अपडेट केल्यास संभाव्य धोका टळू शकतो.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न