Gujarat Accident : भीषण अपघातात अहमदाबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

गुजरात : उत्तर गुजरातमध्ये रस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी उंझा - मेहसाणा महामार्गावरील उनावा गावाजवळ हॉटेल कॉम्फीसमोर झालेल्या अपघातात अहमदाबाद कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, कुमावत कुटुंब राजस्थानमधील एका लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर इको कारने अहमदाबादला परतत होते. उनावाजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार वेगाने दुभाजकावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.


दोन पुरुष, एक महिला आणि एका निष्पाप मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रामलाल लखाजी कुमावत, कोमल मदनलाल कुमावत, कैलाशभाई रामलाल कुमावत आणि एक मुल अशी मृतांची ओळख पटली आहे. कार चालक गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच उनावा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न