SSC Exam 2026 Wishes: तुमच्या दहावीतील प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

मुंबई: दहावीची परीक्षा ही केवळ शालेय शिक्षणाचा शेवट नसून करिअरच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. वर्षभर केलेली मेहनत, रात्री जागून केलेला अभ्यास आणि भविष्यातील स्वप्ने यांचा कस लागण्याचा हा काळ असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मनात भीती, दडपण आणि चिंता असणे स्वाभाविक आहे. पण योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे ही भीती आत्मविश्वासात बदलू शकते. आपल्या घरातील किंवा मित्रपरिवारातील विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असतील तेव्हा त्यांना तू चांगल्या गुणांनी पास होणार आहेस, असा विश्वास देणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यास मदत करतील,असे संदेश पाठवून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा नक्की द्या.


दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा


 

कष्टाची धरून कास



पूर्ण होईल तुझा ध्यास



परीक्षेच्या या क्षणांना



सामोरे जा घेऊन आत्मविश्वास


 

 

नका बाळगू भीती, नका धरू चिंता



यशाची गाथा तुम्हीच आता लिहीत आहात



उद्याचा पेपर जाईल एकदम सोपा



यशाचा मनात सदैव ठेवा ठेवा


 

 

स्वप्नांच्या या उंच आकाशी



भरारी घेण्यासाठी तू सज्ज हो



यश तुझेच आहे मित्रा



फक्त शांत चित्ताने तू प्रत्येक पेपर लिही


 

 

पेन होईल तुझी तलवार



कागद असेल तुझे रणांगण



विजयाचा गुलाल उधळायला



सज्ज झालेय तुझे अंगण


 

 

रात्र-न्-दिवस केली मेहनत



आता फळ मिळण्याची वेळ आहे



दहावीची ही परीक्षा म्हणजे



फक्त तुझ्या बुद्धीची परीक्षा आहे


 

 

लाटांशी झुंज देण्याची



जिद्द तुझ्या उरात असू दे



यशाचे ते सोनेरी शिखर



नेहमी तुझ्या नजरेत असू दे


 

 

अभ्यासाचा केला डोंगर पार



आता यशाचा येईल बहर



न डगमगता सामोरे जा



नक्कीच येईल तुझीच लहर


 

 

डोळ्यांत असू दे जिद्द



मनात असू दे विश्वास



यशाच्या या वाटेवरती



घे तू एक नवा श्वास!


 

 

प्रश्न सोपे, उत्तरे स्पष्ट



फळाला येतील तुझे कष्ट



दहावीच्या या परीक्षेचा



प्रवास होईल तुझा सुस्पष्ट


 

 

शांत मन आणि स्थिर बुद्धी



हीच यशाची आहे गुरुकिल्ली



आत्मविश्वासाच्या जोरावर तू



गाठशील यशाची पहिली पायरी


 

 
Comments
Add Comment

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे

Pankaja Munde : वाडी नगरपरिषदेचा एसटीपी प्रकल्प ३० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील