Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणातील तपशील समोर; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात...

पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परत जात असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित तरुणीने व्हिडीओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले.


मात्र संबंधित तरुणी नेमकी कुठे आहे, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सहा पथक रवाना झाले होते. परंतु तरुणीचा शोध कुठेही लागला नाही. त्यानंतर गुरूवारी मध्यरात्री भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे.


इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे. तरूणी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तरूणीने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तरुणीने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरच्यांना बोलावलं मात्र घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.


मुलींना भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावलं आणि तिथून ते निघून गेले. चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलं, मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आला आहे. पहाटे साडेपाच वाजता पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेत. मुलगी आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे, आता काही वेळापूर्वी झोपली असल्याचे म्हणणं आहे. पोलीस माहिती गोपनीय ठेवत आहेत. एकही अधिकारी बोलायला तयार नाही. पुढे काय होणार काय कारवाई करणार हे देखील सांगायला तयार नाहीत. पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून पहाटे साडेपाचला घेऊन गेले आहेत. कुठं गेलेत याबाबतची माहिती नाही. पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत.


Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या