America Iran War : करार करा, अन्यथा परिणाम गंभीर होतील; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला स्पष्ट धमकी

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सतत वाढत चालला आहे. अमेरिकेची विमानवाहू नौका इराणच्या दिशेने सरकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करावाच लागेल. अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इराणला थेट इशारा दिला आहे.



इराण संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकत नाही:


‘बोर्ड ऑफ पीस’ कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, “इराणने आता आमच्यासोबत आम्ही तयार करत असलेल्या मार्गावर यावे. त्यांनी साथ दिली तर उत्तमच; पण साथ दिली नाही तरीही आम्ही पुढे जाऊ. मात्र तो मार्ग पूर्णपणे वेगळा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, इराण संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकत नाही. “त्यांना करार करावाच लागेल. अन्यथा परिणाम गंभीर असतील,” असा इशाराही त्यांनी दिला.



पुढील दहा दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल:


गुरुवारी तेहरानवर टीका करताना ट्रम्प म्हणाले, “आपल्याला कदाचित हे एक पाऊल पुढे न्यायला लागेल, किंवा कदाचित नाही. कदाचित आपण कराराच्या दिशेने जात आहोत. पुढील दहा दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल.” ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, इराणकडे अण्वस्त्रे असू नयेत. “इराणकडे अण्वस्त्रे असतील तर मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही,” असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा

Middle East War : इराणचा पाठिंबा असो किंवा नसो, अमेरिका होर्मुज खुला करेल - ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज

US-Iran Peace Talks : गालिबाफ यांनी अनोख्या श्रद्धांजलीने अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा

इस्लामाबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला पूर्णविराम देण्यासाठी कूटनीतिक मार्ग शोधण्याच्या उद्देशाने

West Asia War : पश्चिम आशियातले युद्ध सुरूच राहणार ? शस्त्रसंधीची शक्यता मावळली ?

इस्लामाबाद : इस्रायल,अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध २८ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम आशियात सुरू झाले. या