AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १० फेब्रुवारी २०२६ रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर हे नियम आजपासून म्हणजेच शुक्रवार २० फेब्रुवारी पासून अमलात आले आहेत.


त्यामुळे आता एखादा फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने तयार केला असेल, तर त्यावर स्पष्टपणे लेबल लावणे बंधनकारक असेल. तसेच कोणत्याही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्रीबाबत तक्रार आल्यास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ती केवळ ३ तासांच्या आत हटवावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा ३६ तासांची होती.



डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ची गरज:


नियम लागू होण्याच्या एक दिवस आधी, १९ फेब्रुवारीला आयोजित एआय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ची गरज अधोरेखित केली होती. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की जसे अन्नपदार्थांवर ‘न्यूट्रिशन लेबल’ असते, तसेच डिजिटल सामग्रीवरही ती खरी आहे की एआयने तयार केलेली आहे याची स्पष्ट माहिती असावी. यामुळे लोकांना खऱ्या आणि बनावट सामग्रीतील फरक ओळखणे सोपे जाईल. आता प्रत्येक एआय-निर्मित कंटेंटच्या कोपऱ्यात “एआय जनरेटेड” किंवा तत्सम लेबल स्पष्टपणे दाखवणे अनिवार्य असेल. उदाहरणार्थ, एखाद्या नेत्याचा एआयच्या मदतीने तयार केलेला भाषणाचा व्हिडिओ अपलोड करताना तो लेबलशिवाय पोस्ट करता येणार नाही.



मेटाडेटा फाईलचा ‘डिजिटल डीएनए’:


नवीन नियमांनुसार आता मेटाडेटाला एखाद्या फाईलचा ‘डिजिटल डीएनए’ म्हणता येईल. ते स्क्रीनवर दिसत नाही, मात्र फाईलमध्ये अंतर्भूत असते. त्यामध्ये कंटेंट कधी तयार झाला, कोणत्या एआय टूलद्वारे तयार करण्यात आला आणि सर्वप्रथम कोणत्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला याची माहिती नोंदवलेली असेल. एआयच्या माध्यमातून गुन्हा केल्यास तपास यंत्रणा या तांत्रिक चिन्हांच्या आधारे मूळ स्रोतापर्यंत पोहोचू शकतील.



एआय कंटेंटवरील वॉटरमार्क काढणं बेकायदेशीर:


पूर्वी काही जण एआय कंटेंटवरील वॉटरमार्क काढून टाकत असत. आता असे करणे बेकायदेशीर ठरणार आहे. सरकारने प्लॅटफॉर्मना अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे लेबल किंवा मेटाडेटाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित फोटो किंवा व्हिडीओ आपोआप हटवली जाईल किंवा रोखली जाईल.



सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी अधिक वाढली:


एआयचा वापर करून बालकांशी संबंधित अश्लील फोटो - व्हिडीओ तयार करणे, फसवणूक करणे, शस्त्रांशी संबंधित माहिती पसरवणे किंवा एखाद्या व्यक्तीची हुबेहुब नक्कल करणे हे गंभीर गुन्हे मानले जातील. अशा प्रकरणांमध्ये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. आयटी नियमांमध्ये दुरुस्ती केल्यानंतर आता सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार मिळाल्यानंतर ३ तासांच्या आत आक्षेपार्ह कंटेंट हटवावा लागेल. पूर्वी त्यांना ३६ तासांची मुदत होती. या बदलामुळे कंपन्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.


आता कोणताही वापरकर्ता कंटेंट अपलोड करताना ती सामग्री एआयने तयार केली आहे की नाही याची घोषणा करणे आवश्यक असेल. प्लॅटफॉर्मना वापरकर्त्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी योग्य साधने वापरावी लागतील. जर एआय-निर्मित सामग्री उघड न करता प्रकाशित झाली, तर त्यासाठी संबंधित कंपनीलाही जबाबदार धरले जाईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मते, या नियमांचा उद्देश “मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेट” निर्माण करणे हा आहे. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे जनरेटिव्ह एआयच्या माध्यमातून पसरवली जाणारी दिशाभूल करणारी माहिती, ओळख चोरी आणि निवडणुकांमधील हस्तक्षेप यांसारख्या आव्हानांवर नियंत्रण मिळवता येईल.


डीपफेक तंत्रज्ञानामध्ये एआय टूल्सच्या मदतीने एखाद्या वास्तविक व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज दुसऱ्या व्हिडिओ किंवा ऑडिओमध्ये इतक्या सफाईने जोडला जातो की तो पूर्णपणे खरा वाटतो. याच कारणामुळे या तंत्रज्ञानाबाबत सरकारने अधिक कठोर पावले उचलली आहेत.

Comments
Add Comment

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी

Air India: एअर इंडियाचा प्रवास ८ एप्रिलपासून महाग होणार; जाणून घ्या किती खर्च येणार?

नवी दिल्ली: टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्हीही एअर इंडियाने

Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!

वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा