Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर हादरलं! अल्पवयीन मुलीला उचलून जंगलात नेलं आणि सलग ५ दिवस...

अहिल्यानगर हादरलं! अल्पवयीन मुलीला उचलून जंगलात नेलं आणि सलग ५ दिवस...

अहिल्यानगर : राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण तिला जंगलात नेण्यात आलं. सलग पाच दिवस जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

नेमकं घडलं काय ?

मुलगी कॉलेजला जाते असं सांगून १३ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ आपली मुलगी हरवल्याचे राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि काही दिवसातच पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधाराने मुलीची सुटका केली.

जंगल परिसरातून पोलिसांची सुटका

राहुरी परिसरातून गायब झालेली मुलगी नाशिक सुरत रोड लगत असणाऱ्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात सापडली. सतत ५ दिवस ३ नराधमांनी केलेल्या अत्याचारामुळे मुलीची परिस्थिती अगदीच खराब झाली होती. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलातून मुलीची सुटका केली.

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणात मुख्य आरोपी मुफ्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >