Shiv Jayanti 2026 : मुंबईत शिवजन्मोत्सवाचा शाही थाट! राज्यपाल आणि महापौरांच्या उपस्थितीत शिवरायांना अभिवादन

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत आणि मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला. शिवाजी पार्क येथील अभिवादनानंतर क्रीडा भवन येथे एक छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रितू राजेश तावडे होत्या. महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासावर आधारित गौरवगीते सादर केली. या सादरीकरणाने प्रभावित होऊन राज्यपाल महोदयांनी अकादमीच्या चमूला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.



गेट वे ऑफ इंडिया आणि भायखळा येथेही मानवंदना


मुंबईच्या विविध ऐतिहासिक स्थळांवरही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गेट वे ऑफ इंडिया मधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पहाटे ७ ते ९ या वेळेत सनई-चौघड्यांच्या सुरांनी परिसर दुमदुमला होता. श्री शिव छत्रपती मंडळाच्या सुहासिनींनी महाराजांची भावपूर्ण आरती केली. भायखळा मधील 'बाल शिवाजी'च्या पुतळ्यालाही मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक उपस्थित होते. पालिकेच्या मुख्य सभागृहातील महाराजांच्या अर्धपुतळ्यास महापौरांनी पुष्पहार अर्पण करून प्रशासकीय स्तरावर शिवजयंती साजरी केली.

Comments
Add Comment

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर