Eknath Shinde: "गेल्या वर्षी याठिकाणी दादा..."; अजित पवार यांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. स्वराज्याची स्थापना करणारे, रयतेच्या हितासाठी आयुष्य समर्पित करणारे तसेच शौर्य, धैर्य आणि न्यायाचे अद्वितीय आदर्श घालणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धे आणि दूरदर्शी नेते होते. अशातच गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वा शिव जयंती उत्सव संपूर्ण देशात साजरा होत आहे. शिवनेरी गडावर देखील अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरी गडावर पोहोचले.


अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरी गडावर भाषण केले. शिवनेरी गडावर गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांची आठवण आली. भाषणासाठी उभे राहताच एकनाथ शिंदे यांनी भावूक होत म्हटले की, गेल्या वर्षी याठिकाणी दादा आपल्यासोबत होते.


एकनाथ शिंदे भावूक: 


आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत अजित दादा होते… त्यांना सुरूवातीलाच आपण श्रद्धांजली अर्पित केली. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. असं बोलताना एकनाथ शिंदे भावूक झाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो.





हिंदुत्वाचा ओंकार म्हणजे शिवछत्रपती:


यशवंत, किर्तीवंत, सामर्थवंत, पुण्यवंत असे आपले जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म दिवस आहे. हिंदुत्वाचा ओंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे युगपुरूष, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती..



शिवनेरीवर आल्यावर नवी उर्जा, प्रेरणा, बळ मिळते:


आपण आज शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती इथे शिवनेरीवर साजरी करतोय. शिवनेरीवर आल्यावर नवी उर्जा, प्रेरणा, बळ मिळते. दिल्लीच्या जेएनयूमदध्ये शिवरायांवर अध्ययन केलं जातंय. गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाचे कार्य आपण हाती घेणार आहोत. महाराजांची जन्मभूमी आणि जुन्नर तालुक्याचा विकास करण्याचा आम्ही नियोजन केलं आहे.



मोदी शिवरायांचे निस्सीम भक्त:


पंतप्रधान मोदी शिवरायांचे निस्सीम भक्त आहेत. शिवरायांच्या आदर्शाने आणि प्रेणनेने आपण मार्गक्रमण करतोय. शिवराय काळाच्या पुढे विचाऱ करणारे स्वराज्याचे निर्माते होते. आदर्श राजा कसा आसावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलाय. आपलं सरकारही तसंच काम करतंय. शिवरायांचा एक एक गुण अंगिकारणं गरजेचं आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन ठाणे : बारामती विधानसभा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या