Jalgaon: चिमुकलीचं डोकं अडकलं भांड्यात; ११ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश

जळगाव: लहान मुलं काय करतील आणि काय नाही, याचा काही नेम नसतो. कधीकधी नकळत केलेल्या गोष्टी त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. अशीच एक घटना जळगावात घडली आहे. साडेतीन वर्षांची चिमुकली सानिया आपल्या घरात खेळत असताना तिचं डोकं अ‍ॅल्युमिनिअमच्या एका अरुंद भांड्यात अडकलं. हे पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर डॉक्टरांनी एका प्लंबरच्या मदतीने अत्यंत कौशल्याने हे भांडं कापून काढलं आणि सानियाची त्यातून सुटका केली.



नेमकं झालं काय?


सानिया घरात खेळत असताना तिने गंमत म्हणून अ‍ॅल्युमिनियमचं एक भांडं डोक्यावर घेतलं. पण काही वेळातच ते भांडं तिच्या मानेपाशी घट्ट अडकलं. पालकांनी ते काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. उलट सानिया वेदनेने रडू लागली. वेळ न घालवता पालकांनी तिला तशाच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेलं.


डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने एका प्लंबरला बोलावून घेतलं. हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचं होतं, कारण कटरचा वापर करताना चिमुकलीच्या डोक्याला किंवा मानेला इजा होण्याची भीती होती. सुरक्षा म्हणून सानियाच्या डोक्याला आणि भांड्याच्या मधे पुठ्ठा, प्लास्टिकचा तुकडा आणि रुमाल सरकवण्यात आला. प्लंबरने कटरच्या मदतीने भांड्याला चीर पाडण्यास सुरुवात केली. इकडे सानिया वेदनेने तळमळत होती, पण डॉक्टरांची टीम पालकांना धीर देण्याचे काम करत होती. कटरने भांड्याचा एक भाग कापून काढला, पकडीने भांडं वाकवलं, पण डोकं काही बाहेर येत नव्हतं.


अखेर डॉक्टरांनी सानियाला झोपवून भांड्याला दुसऱ्या बाजूने पुन्हा चीर पाडली. चौघांनी मिळून डोकं आणि भांडं विशिष्ट कोनात फिरवलं आणि अकरा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर सानियाचं डोकं भांड्यातून सुरक्षित बाहेर आलं. सुटका होताच सानियाने आपल्या वडिलांना मिठी मारली. "त्या ११ मिनिटांत एक छोटीशी चूकही मोठी इजा करू शकली असती, पण सर्वांच्या सहकार्याने सानिया सुखरूप आहे," असे डॉक्टरांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

Ashadhi Ekadashi 2026 : पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले का असतात ? जाणून घ्या 'हे' गुपित अन् पौराणिक कथा!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे प्राण आणि भक्तांचे पाठीराखे असलेल्या भगवान

Shivshahi Bus Fire : धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० हून अधिक प्रवाशांचे प्राण

धुळे : धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला बुधवारी अचानक भीषण आग

Pune Crime : मित्रांशी गप्पा मारत उभा होता... तितक्यात मागून 7 जण आले अन् अवघ्या 30 सेकंदांत 30 वार; पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे: पुण्यातील कात्रज तलाव परिसरात सोमवारी रात्री एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक

Ajit Pawar Birthday : अजितदादांच्या आठवणींनी भावुक झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू..."; अजितदादांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भावनिक

Devendra Fadnavis : 'देवेंद्र! बस नाम ही काफी है'; मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनोख्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शब्दांत