कराचीत गॅस गळतीमुळे ३ मजली इमारत कोसळली, अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीत गॅस गळती झाली. या गॅस गळतीची तीव्रता एवढी होती की, मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन कोसळली. इमारत कोसळून चार बालके आणि सहा मुलांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच १४ जण जखमी झाले.


सोल्जर बाजार नंबर ३ मधील या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बुधवारी रात्री उशिरा गॅस गळतीमुळे स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, भोवतालचा परिसर हादरला. झोपेत असलेल्या रहिवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. इमारत धाडकन कोसळली. या दुर्घटनेत १० वर्षांच्या चिमुरडीपासून ६० वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एवढी अरुंद जागा आहे की, मदतकार्यात असंख्य अडचणी येत आहेत. पोलीस आणि मदत पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखालून एका १४ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.


स्फोट प्रकरणी चौकशी होईल. स्फोटाचे कारण तपासले जाईल. इमारत अधिकृत होती की नव्हती याचीही तपासणी होणार आहे.

Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.