शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी रायगडवरील 'ही' महत्त्वाची सेवा सहा दिवस पूर्णपणे बंद

पुणे: शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रोप-वेची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. रोप-वेच्या वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्याप्रमाणे करावे, असे आवाहन रोप-वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


सालाबादप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही नियमित प्रक्रिया राबवली जाते. या सहा दिवसांच्या कालावधीत रोप-वे यंत्रणेची सखोल तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य केबल्स आणि ट्रॉलीची तपासणी, ब्रेक प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची चाचणी तसंच विद्युत यंत्रणा आणि तांत्रिक सुटे भाग यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.



१ मार्चपासून सेवा पूर्ववत



२८ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल. जे पर्यटक पायी चढून जाऊ शकत नाहीत, त्यांनी या तारखांची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, जेणेकरून गडावर आल्यावर त्यांची गैरसोय होणार नाही.

Comments
Add Comment

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत