Pune: पुण्यातील धक्कादायक घटना; तरुणीचं भररस्त्यात अपहरण

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात ही घटना घडली आहे. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुणी आपल्या दुचाकीवरून चालली होती, त्यावेळी दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी आई व भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केलं.

अपहरण झालेली तरुणी ही आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी आरोपी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळायच्या आत आरोपींनी अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल चटणी फेकली, ज्यामुळे त्यांना काहीही दिसणे अशक्य झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी २१ वर्षीय तरुणीचं अपहरण केले आणि तिथून पळ काढला.

तरुणीच्या आई आणि भावाने आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी दोघांची मदत केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. तपासकामी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. ​टोल नाके आणि मुख्य रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. याप्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झालेत त्यांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर येते गर्दी केली आहे.
Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :