नवी मुंबई, नवी क्षमता - जागतिक लॉजिस्टिक्समध्ये महाराष्ट्राची गरुड झेप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स हबचे भूमिपूजन केले.


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा केवळ भूमिपूजन समारंभ नसून भारत, मुंबई आणि महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे. जागतिक व्यापार क्षेत्रातील बदलती परिस्थिती आणि पुरवठा साखळीच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर अशा काळात फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारत आणि महाराष्ट्राच्या सामर्थ्याचा ठोस पुरावा आहे. नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वोत्तम व सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ ठरेल. फेडेक्सचे टर्मिनल सुरू झाल्याने या विमानतळाची क्षमता अधिक बळकट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी अधिक सक्षम होईल आणि विशेषतः मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक क्षमतेला मोठी चालना मिळेल. २०४७ पर्यंत $५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यात नवी मुंबई विमानतळाचा महत्त्वपूर्ण वाटा असेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


कार्गो व ट्रान्सशिपमेंट हब हे आधुनिक व्यापाराचे प्रमुख घटक बनले असून लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी ही व्यवसाय वृद्धीसाठी अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यावर भर दिला जात असून अत्याधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फेडेक्ससारख्या कंपन्या या प्रक्रियेला गती देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


नवी मुंबई विमानतळावर अशा आणखी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात आणि हे विमानतळ देशातील सर्वोत्तम ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.


यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदानी, फेडेक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्स एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (आंतरराष्ट्रीय) रिचर्ड स्मिथ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या