Muslim Community Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण अखेर रद्द

मुंबई: राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेले ५ टक्के 'सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग' (एसईबीसी) आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून, यामुळे गेल्या १२ वर्षांपासून चर्चेत असलेले हे आरक्षण आता अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.


तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने जुलै २०१४ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला एकमताने मंजुरी देण्यात आली होती. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.



आरक्षण रद्द होण्याची मुख्य कारणे


 

१) न्यायालयाची स्थगिती : उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील ५ टक्के आरक्षणाच्या तरतुदीला अंतरिम स्थगिती दिली होती.
२) अध्यादेश व्यपगत (लॅप्स) झाला : मुस्लिम आरक्षणासंदर्भातील अध्यादेशाचे डिसेंबर २०१४ पर्यंत कायद्यात रूपांतर करणे आवश्यक होते. ठराविक कालावधीत कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे हा अध्यादेश तांत्रिकदृष्ट्या व्यपगत झाला आहे.
३) दाखले देण्याची प्रक्रिया थांबणार :एसईबीसी अंतर्गत मुस्लिम समाजाला देण्यात येणाऱ्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील तरतुदीही आता रद्द झाल्या आहेत.



कुठे कुठे होते आरक्षण?


 

विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लिम गटाला शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी ही सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे अखेर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.