Wardha Train Fire: देशात आगीच्या घटना सुरूच; वर्धा GT एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, मोठा अनर्थ टळला

देशात गेल्या दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत आहेत. आज (मंगळवार १७ फेब्रुवारी) वर्धा - तुळजापूर रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंधी जीटी एक्सप्रेस असलेल्या डब्याला अचानक भीषण आग लागली. रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा GT एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्याला अचानक ही आग लागली. हा डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. आग इतकी भयंकर होती की काही मिनिटांत संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. आगीची महिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. सुरुवातीला ही आग पार्सल कोचला लागली. त्यानंतर ही आग पसरुन गार्डच्या डब्याला लागली. ही ट्रेन तुळजापूरजवळ थांबवण्यात आली आहे. काही लोक या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.


राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी (१६ फेब्रुवारी) एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१