Narhari Zirwal: सुनेत्रा पवार नरहरी झिरवळांवर नाराज; म्हणाल्या...

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांचं नाव सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नरहरी झिरवाळ यांना सुनावलं आहे. यावरून त्या त्यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.



नेमकं प्रकरण काय ?


अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आले. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.


या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या झिरवाळ यांच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.



पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या :


स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवाळ यांना केल्याचे सांगितले जाते. अन्न आणि औषध खात्याच्या कर्मचाऱ्याला एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वेगाने कारवाई सुरु झाली होती. त्यानंतर नरहरी झिरवळ अज्ञातवासात गेले होते. त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने ते जवळपास नॉट रिचेबल होते. मात्र, याप्रकरणाची प्रचंड चर्च व्हायला लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यानुसार काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग