Eknath Shinde : ठाणेकरांनो, आता ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा! घोडबंदर रोडच्या रस्ता रुंदीकरणासाठी DCM शिंदेंचा अल्टिमेटम

मुंबई आणि महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आपला यंदाचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १६० व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या भव्य अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या नऊ वर्षांच्या तूट सोसल्यानंतर प्राधिकरणाने प्रथमच १७ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर करून आर्थिक शिस्तीचे दर्शन घडवले आहे. या अर्थसंकल्पातील तब्बल ७५ टक्के रक्कम ही पायाभूत सुविधांवर खर्च केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, बोगदे, बाह्य वळण रस्ते आणि महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. एमएमआर परिसरात भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याची गरज ओळखून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी नियोजनासाठी विशेष तरतूद आणि ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करण्यासाठी मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. "मुंबई महानगर प्रदेशाला वाहतूक कोंडीतून मुक्त करणे आणि नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे," असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या मोठ्या गुंतवणुकीमुळे आगामी काळात मुंबई आणि उपनगरातील पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.



बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे



  • एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

  • शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ३३७ किलोमीटर मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

  • मेट्रो नेटवर्कसाठी १३ हजार ८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्ग ४,६,५,२ ब आणि मार्ग १२ या प्रकल्पांना वेग द्यावा असे सांगितले.

  • एमएमआर क्षेत्रातील सर्व प्रमुख मनपांचा मिळून नीती आयोगाच्या मदतीने एक 'बृहद आराखडा' तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही
    उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

  • लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सेवा तर ठाणे व मीरा-भाईंदर येथे बोट टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. मेट्रो-बस-जलवाहतूक यांची एकत्रित जोडणी करून प्रवास अधिक जलद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरग्राउंड टनेलिंग प्रकल्प, कोस्टल रोड आणि भिवंडी-नाशिक मार्गावरील पर्यायी रस्ते उभारले जात आहेत.

  • ट्रॅफिक ब्लॅकस्पॉट ओळखण्यासाठी स्वतंत्र अभ्यासही करण्यात येणार आहे.

  • मुंबईतील एलफिन्स्टन पुलाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आणि घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरणाचे काम महिनाभरात पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

  • मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून एमएमआरडीएच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर नगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एसआरएकडून नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  • मुंबईत १७ प्रकल्पांची यादी तयार असून ठाण्यात पाच इमारतींच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. रस्ते, मेट्रो, धरण यासोबतच एमएमारडीएच्या माध्यमातून चांगली घरे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे

महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला