निवृत्ती घेतलेल्याना लाभ मिळणार की नुकसान होणार?; आयोगाबाबत केंद्राचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेतून २०२५ अखेरपर्यंत निवृत्त झालेल्यांना नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत कोणतीही कपात किंवा भेदभाव होणार नसल्याचे सांगितले आहे.



केंद्रीय अर्थमंत्र्यांची माहिती


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सध्याचा आठवा वेतन आयोग हा केंद्रातील कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनरचनेचा आणि भत्त्यांचा सर्वांगीण आढावा घेणार आहे. अर्थसंकल्प २०२५ मधील तरतुदींमुळे सध्या लागू असलेल्या पेन्शन नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरी तसेच संरक्षण क्षेत्रातील माजी कर्मचाऱ्यांनाही समान तत्त्वांवर लाभ लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.



शिफारशींसाठी तुम्ही इथे आपले मत नोंदवू शकता


आयोगाच्या कामकाजासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून नागरिक सहभागासाठी MyGov या मंचाद्वारे मते मागवण्यात येत आहेत. वेतनवाढ, भत्त्यांची पुनर्रचना, तसेच निवृत्तिवेतनातील सुधारणा याबाबत सूचना नोंदवता येणार आहेत.



सहभागाची मुदत


संबंधित अभिप्राय १६ मार्चपर्यंत सादर करता येणार असून कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक तसेच इच्छुक नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. शासनाच्या मते, जास्तीच्या सहभागामुळे आयोगाच्या शिफारशी अधिक सर्वसमावेशक ठरतील.



निवृत्तिवेतनधारकांबाबत स्पष्टता


३१ डिसेंबर २०२५ पूर्वी सेवामुक्त झालेल्यांनाही आयोगाच्या अंतिम शिफारशी लागू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिफारशी मंजूर झाल्यानंतर सर्वसाधारण आदेशाद्वारे त्यांची अंमलबजावणी होईल. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारने अधोरेखित केले आहे. या स्पष्टीकरणानंतर कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

CSKvsRR : वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने चेन्नई विरोधात राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नवा कर्णधार रियान परागच्या नेतृत्वात सोमवारी

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित

पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान; फडणवीस-शिंदे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई : गेल्या काही दिवसांपासून

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

यापुढे महापालिकेत ५० खोक्यांची भाषा करणाऱ्यांना मिळणार ५० ठोसे

अशासकीय शब्दांचा वापर करणाऱ्यांना आता सभागृहाबाहेरचा रस्ता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात

विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा एकदा कांगावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना सध्या कोणत्याही मुद्दयावर आपली भूमिका

महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीवर १३ सदस्यांची नियुक्ती जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर निवडून आलेल्या विविध पक्षांच्या १३ सदस्यांची