Ameesha Patel : आता अमिशा पटेल ११ लाखांसाठी खाणार जेलची हवा? अजामीनपत्र वॉरंट जारी, प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कायदेशीर कारवाईचे सत्र सुरू असून, अभिनेता राजपाल यादव नंतर आता अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. २०१७ मधील एका फसवणुकीच्या प्रकरणात मुरादाबाद न्यायालयाने अमिषा विरोधात अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे. मुरादाबादमधील 'ड्रीम व्हिजन' इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी अमिषा विरोधात खटला दाखल केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, एका विवाहसोहळ्यात डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी अमिषाला ११ लाख रुपये आगाऊ (Advance) देण्यात आले होते, मात्र तिने ऐनवेळी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे परत करण्याच्या मागणीनंतर अमिषाने दिलेला धनादेश (Check) बँकेत बाऊन्स झाला. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार समन्स बजावूनही अमिषा कोर्टात हजर न राहिल्याने न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे अमिषाला आता तात्काळ न्यायालयात हजर व्हावे लागेल, अन्यथा तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.



वारंवार समन्स बजावूनही न्यायालयाच्या आदेशांकडे पाठ फिरवणे अभिनेत्री अमिषा पटेलला आता चांगलेच महागात पडणार आहे. शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक आणि वकिलांची अनुपस्थिती यांसारखी कारणे देऊन अमिषा आजवर सुनावणीला दांडी मारत होती. मात्र, आता न्यायालयाच्या संयमाचा बांध सुटला असून, "न्यायालयाची अवहेलना सहन केली जाणार नाही," अशा कडक शब्दांत ताकीद देत तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. मुरादाबाद न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्च २०२६ रोजी निश्चित केली आहे. जर अमिषा या तारखेला न्यायालयात हजर झाली नाही, तर पोलिसांना तिला कोणत्याही परिस्थितीत अटक करून कोर्टात हजर करावे लागेल. अभिनेता राजपाल यादवला झालेल्या तुरुंगवासानंतर आता अमिषावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारांची आणि कायदेशीर गांभीर्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत