Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात पार पडणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात नेमके कोणते महत्त्वाचे टप्पे असतील, याचा सविस्तर तपशील समोर आला आहे.


अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, शोक प्रस्ताव मांडले जातील आणि सन २०२५-२०२६ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल, तर २६ व २७ फेब्रुवारीला पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होऊन २७ फेब्रुवारीला पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल. २८ फेब्रुवारी रोजी देखील शासकीय कामकाज सुरू राहील.



बजेट कधी सादर होणार ?


मार्च महिन्यातील कामकाजाचा विचार करता, १ मार्च (रविवार) आणि २ मार्च रोजी बैठक होणार नाही, तर ३ मार्चला होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे शुक्रवार, ६ मार्च २०२६ असून, या दिवशी दुपारी २:०० वाजता राज्याचा सन २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्यानंतर ९ आणि १० मार्च रोजी अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होईल. १ मार्च ते १६ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदान पार पडेल, ज्यामध्ये १६ मार्च रोजी विनियोजन विधेयक सादर केले जाईल.


अधिवेशनाच्या उत्तरार्धात, १९ मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी असेल आणि २० मार्चला बैठक होणार नाही. २४ मार्च रोजी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि २५ मार्च रोजी शासकीय कामकाजासह अधिवेशनाची सांगता होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासासाठी मंत्र्यांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून, संबंधित दिवशी त्या त्या गटातील मंत्री प्रश्नांना उत्तरे देतील. या नियोजित वेळापत्रकात कामकाजाच्या गरजेनुसार फेरफार होऊ शकतो, असे विधानसभा सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी १० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध