शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे शरसंधान


स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे 3 दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार नाही, हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरेंची दातखीळ बसली आहे का? छत्रपतींचा अवमान होत असताना उद्धव ठाकरे यांनी निषेध का केला नाही असे परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केले. उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान, थोडी जरी धमक शिल्लक असेल तर उबाठा गटाने हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करावे असे आव्हान बन यांनी दिले.


टिपू सुलतानवरून भाजपावर टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की, भाजपाचे धोरण स्पष्ट आहे. जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो, हिंदू मंदिरांची तोडफोड करतो, हिंदू आया बहिणींवर ज्याने बलात्कार केले, त्या टिपू सुलतानचे समर्थन भाजपा कधीच करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना मालवणी मध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची आठवण करून देत  बन म्हणाले त्यावेळी या विरोधात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपा नेते मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, तेजिंदर तिवाना यांनी प्रखर विरोध केला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या पण त्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देऊ दिल नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आंदोलन करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हीन काम केलं होते असे टीकास्त्र  बन यांनी सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना संजय राऊत त्याचा संबंध निवडणुकांशी जोडायचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत, राजकारण करत आहेत. भाजपासाठी शिवरायांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही, अस्मितेचा विषय आहे. निवडणूक पाहून आंदोलन करणे भाजपाच्या तत्वात बसत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा सन्मान राखू असे  बन यांनी निक्षून सांगितले.


सपकाळांनी महाराष्ट्राची माफी मागावी


छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा कदापि सहन करणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ आहे असा इशारा बन यांनी दिला.


मनी लॉन्ड्रिंगमध्ये काँग्रेस एक्सपर्ट


मनी लॉन्ड्रींग करण्याचे उद्योग कर्नाटक सरकार करत आहे तसेच केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यांचे प्रकार उघडकीस आले होते. काळा पैसा पांढरा कसा झाला हे मल्लिकार्जून खरगे यांनी चिदंबरम यांना विचारायला हवे असा टोलाही  बन यांनी लगावला.


भाजपाच्या गणेश नाईकांना त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतावे असा सल्ला देणा-या राऊतांना सणसणीत चपराक मारत बन म्हणाले की, राऊत आपली खासदारकी संपली की खासदारकीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसणार आहेत हे महाराष्ट्राला देखील माहीत आहे.


पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्याचे रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा महायुती सरकार संवेदनशील असून लवकरच त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा भाजपाचा निर्धार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने नोकरी देण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे बन म्हणाले .

Comments
Add Comment

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Thane : ठाण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

ठाणे : माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) दुपारी २१

Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक