मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए ?

ठाणे : ठाणे महापालिकेत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. ठामपामध्ये ३३ प्रभाग आणि १३१ जागा आहेत. यातील ७५ जागांवर शिवसेना आणि २८ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जण निवडून आले आहेत. उबाठा एका जागेवर तर इतर १२ जागांवर विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर यांनी महापौर तर भाजपच्या कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदाची सूत्रं स्वीकारली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई प्रमाणेच ठाण्याच्या विकासासाठी टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी केली आहे.


मुंबई आणि भोवतालच्या शहरांच्या विकासाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची स्थापना करण्यात आली आहे. याच पद्दतीने आता ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांच्या आणि भोवतालच्या गावांच्या विकासाकरिता टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे. अद्याप या मागणीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलेले नाही. पण या मागणीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे मनपात शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने टीएमआरडीए स्थापन करण्याची मागणी भाजपने केल्याची चर्चा आहे. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत आणि विकासाला गती देण्याच्या हेतूने टीएमआरडीएची मागणी केल्याचे सांगितले आहे.


उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पत्रातून प्रस्तावित केलेल्या टीएमआरडीएचे हेतू काय असतील ?




  • शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे

  • बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावणे, सामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे

  • शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम घालून कामात पारदर्शकता आणणे

  • अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे

  • नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे