Versova-Madh passenger jetty: वर्सोवा-मढ प्रवासी जेट्टीचा चेहरामोहरा बदलणार

- मंत्री नितेश राणे यांनी दिले घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश


मुंबई : वर्सोवा-मढ परिसरातील प्रवाशांची सुरक्षा आणि जेट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या भागात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेत, जेट्टी परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तातडीने घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


वर्सोवा आणि मढ दरम्यान दररोज हजारो प्रवासी आणि मच्छिमार प्रवास करतात. मात्र, गेल्या काही काळापासून जेट्टी परिसरात अस्वच्छता आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर राणे यांनी या परिसराचा दौरा केला.


मच्छिमार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत राणे यांनी जेट्टीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे सुचवले. विशेषतः जेट्टी परिसरात होणार कचरा आणि अस्वच्छता रोखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


या पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे, बंदर निरीक्षक जयश्री कांबळे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील खरमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईसाठी अखेर कंत्राटदार पावले

तीन कामासाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या