ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिले. दव फॅक्टर लक्षात घेऊन श्रीलंकेने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्व गडी गमवून १८१ धावा केल्या. तसेच विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले. श्रीलंकेने हे आव्हान २ गडी गमवून पूर्ण केले. पाथुम निस्संकाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या विजयासह श्रीलंकेने सुपर ८ फेरीत जागा मिळवली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस नाही, पण चमत्कारीक गणित असेल. पण त्यात झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत सर्वाधिक संधी आहे. झिम्बाब्वे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला की सुपर ८ फेरीत जागा मिळवेल.


श्रीलंकेने विजयाचा पाठलाग करताना पहिलीच विकेट ८ धावांवर गमावली. कुसल परेरा फक्त १ धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने ९७ धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिस ५१ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर पाथुमने पवन रत्नायकेसोबत खेळी पुढे नेली. या जोडीने हा खेळ संपवला. पाथुम निस्संकाने ५२ चेंडूत १०० धावा केल्या आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. यावेळी १० चौकार आणि ५ षटकार मारले.


ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचच्या शर्यतीत आता पथूम निसंकाही आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या लढतीत निसंकाने सर्वोत्तम कॅच टिपताना ग्लेन मॅक्सवेलला माघारी जाण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरूवातीनंतर मात्र मोठी धावसंख्या गाठता आली नाही.


मिचेल मार्शच्या वापसीने ऑस्ट्रेलिया बळ मिळालेले पाहायला मिळाले. यजमान श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्यांना मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. हेडने २९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांनी ५६ धावांची खेळी करताना मार्शसोबत पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. दुशान हेमांथाने ही जोडी तोडली. मार्श-हेडने सेट केलेली गती कायम राखण्याच्या प्रयत्नात कॅमेरून ग्रीन ( ३) दुनिथ वेलालागेच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. ऑस्ट्रेलियाने सहा धावांच्या फरकाने दोन फलंदाज गमावले. हेमांथाने पुढील षटकात मार्शला पायचीत पकडले अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. मार्श २७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. त्याने ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात सर्वाधिक चौकार मारले. पुढच्याच चेंडूवर जॉश इंग्लिसला यष्टिचीत करण्याची संधी यष्टिरक्षक कुसल मेंडिसने गमावली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकले. टीम डेव्हिडही ( ६) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कमिंदू मेंडिसला विकेट देऊन परतला. मॅक्सवेल पुन्हा एकदा कँडीवर वादळी खेळी करतोय असे दिसत होते, परंतु १७व्या षटकात हेमंथाच्या चेंडूवर त्याने मारलेला रिव्हर्स स्विप ऑस्ट्रेलियाला धक्का देणारा ठरला. पथून निसंकाने हवेत झेपावत अविश्वसनीय झेल टिपून मॅक्सवेलला माघारी पाठवले. मॅक्सवेल १५ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह २२ धावा केल्या. सलामीवीरांनी १०४ धावांची सलामी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर रोखले. दुशान हेमंथाने तीन विकेट्स घेतल्या. ८१ धावांत ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स गमावल्या.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)