Share Market: शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीत चढउतार

मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (१६ फेब्रुवारी) सुरुवातीच्या सत्रात चढउतार पाहायला मिळाले. व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली असली तरी लगेचच खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणात पोहोचले. मात्र ही तेजी फार काळ टिकली नाही. सुरुवातीच्या वीस मिनिटांनंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांक पुन्हा घसरले. सकाळी दहा वाजेपर्यंत सेन्सेक्स सुमारे ०.१६ टक्के आणि निफ्टी ०.१२ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह व्यवहार करत होते.


आज सकाळी दहा वाजेपर्यंतच्या व्यवहारात काही आघाडीच्या समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आणि ओएनजीसी यांच्या समभागांत २.४० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. याउलट जिओ फायनान्शियल, इन्फोसिस, हिंडाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या समभागांमध्ये १.५० टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.


एकूण बाजारातील चित्र मिश्र स्वरूपाचे होते. सुमारे २,६४६ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते. त्यापैकी ८५८ समभाग वाढीसह हिरव्या निशाणात होते, तर १,७८८ समभाग घसरणीसह लाल निशाणात व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील ३० पैकी ११ समभाग वाढीत होते, तर १९ समभागांवर विक्रीचा दबाव होता. निफ्टीमधील ५० पैकी १३ समभाग वाढीसह तर ३७ समभाग घसरणीसह व्यवहार करत होते.


व्यवहाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स १४६ अंकांच्या घसरणीसह ८२,४८० या पातळीवर उघडला. त्यानंतर खरेदी वाढल्याने तो ८२,७८६ पर्यंत कसळला; मात्र पुन्हा विक्री वाढल्याने चढउतार कायम राहिले. सकाळी सुमारे १०.१५ वाजता सेन्सेक्स १३० अंकांच्या वाढीसह ८२,७५७ या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टीचीही सुरुवात ४७ अंकांच्या घसरणीसह २५,४२३ या स्तरावर झाली होती. पुढे तो २५,५२८ पर्यंत गेला, परंतु नंतर पुन्हा दबावाखाली आला. सकाळी दहा वाजता निफ्टी सुमारे ३० अंकांच्या वाढीसह २५,५०१ या स्तरावर व्यवहार करत होता.


गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मात्र बाजारात मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल १,०४८ अंकांनी घसरून ८२,६२६ वर बंद झाला होता, तर निफ्टी ३३६ अंकांनी घसरून २५,४७१ वर स्थिरावला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या सत्रात गुंतवणूकदार सावध भूमिकेत असल्याचे चित्र दिसून आले.

Comments
Add Comment

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत

पार्थ पवार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

Neelam Gorhe : मंत्रिपद मिळवण्यासाठी नीलम गोऱ्हे भोंदूबाबा खरातच्या चरणी!

- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा खळबळजनक आरोप मुंबई : महिलांच्या लैंगिक शोषणाचे

Nitin Navin : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला आपल्या आमदारकीचा राजीनामा

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन नवीन यांनी आज

Sunil Gavaskar : आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण

Ashok Kharat Case : भोंदू बाबाचा मोठा पर्दाफाश! खरातचा सीएही रडारवर, १५०० कोटींच्या मालमत्तेचा होणार तपास

मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक