Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, पोस्ट करत...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच, अपूर्वाने आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत विवाहबंधनात अडकत प्रेमाला अधिकृत नाव दिले. समाज माध्यमावर लग्नाचे खास फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी शेअर केली.


झी मराठीवरील गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत ‘शेवंता’ हे नकारात्मक पण लक्षवेधी पात्र साकारत अपूर्वा घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयामुळे ‘शेवंता’ या भूमिकेचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतानाच अपूर्वाने आपल्या सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळेही प्रेक्षकांची मने जिंकली. यासोबतच, बिग बॉस मराठी ४ या पर्वात उपविजेती ठरल्यामुळे अपूर्वाची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉसच्या घरात तिने दाखवलेली संयमशीलता, प्रामाणिकपणा आणि ठाम भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.


लग्नानंतर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले की, आयुष्याने तिला अनेकदा कसोटीला लावले, तोडले आणि पुन्हा घडवले. पण, तिने प्रेमावरचा विश्वास कधीही सोडला नाही. अनेक वादळांनंतर देवाने तिला शांतता आणि सहवास दिला, असे सांगत तिने आपल्या नव्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आता ती अधिकृतपणे ‘सौ अपूर्वा तनुज गोवलकर’ झाली असल्याचे तिने अभिमानाने नमूद केले.





विशेष म्हणजे, अपूर्वा आणि तिचा पती तनुज यांनी याआधीही एक खास फोटोशूट केले होते, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्या फोटोंवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिनेही प्रेमळ प्रतिक्रिया दिली होती.


चाहत्यांसाठी अपूर्वाचे हे नवे पर्व आनंदाची बातमी ठरली असून, सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनयाच्या यशस्वी प्रवासानंतर आता वैयक्तिक आयुष्यातही तिने स्थैर्य आणि प्रेमाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही

येऊदे कितीही अडचणीचं वारं... ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच ! मुंबई : असं म्हणतात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडली गेलेली नाती

Jahnavi Killekar : ‘ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र?’; रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरची टीका, बिग बॉस व रितेश देशमुखांविरोधातील वक्तव्यांवर संताप

मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब