हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामन्यात कोण कोण खेळणार ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सामन्यात दोन्ही देशांकडून कोणकोणते खेळाडू मैदानात उतरणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.



भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा बरा झाला आहे. त्याने शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सराव केला. यामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी अभिषेकचा विचार होण्याची शक्यता आहे. याआधी नामिबिया विरूद्धच्या सामन्यात तब्येत बरी नसल्यामुळे अभिषक शर्मा खेळला नव्हता.



अभिषेकचे पुनरागमन झाल्यास संजू सॅमसनला पुन्हा एकदा वगळले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय भारताचे संघ व्यवस्थापन संध्याकाळीच जाहीर करण्याची शक्यता आहे.


श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात चायनामन कुलदीप यादवलाही मैदानात उतरवू शकतो . संघात तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. तीन फिरकीपटूंना खेळवण्यासाठी अर्शदीपला वगळले जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचा विचार वेगवान गोलंदाजीसाठी होऊ शकतो. नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी हार्दिक आणि जसप्रीतकडे दिली जाण्याची शक्यता आहे.



पाकिस्तान भारताविरोधात पाच फिरकीटूंना खेळवण्याचा विचार करू शकतो. शादाब खान, उस्मान तारिक, अबरार अहमद, सईम अयुब आणि मोहम्मद नवाज या फिरकीपटूंना खेळवले जाण्याची शक्यता आहे. सईम अयुबचाही गोलंदाज म्हणून विचार होऊ शकतो. उस्मान तारिक हा किती यशस्वी होणार यावर पाकिस्तानचे यश अवलंबून असेल.


संभाव्य अकरा खेळाडू


भारत : अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.


पाकिस्तान : सॅम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला