Mulund Metro Slab Collapse: मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेत एमएमआरडीएची मोठी कारवाई; थेट पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी "हा १०० टक्के निष्काळजीपणा आहे, दोषींवर कडक कारवाई केली जाईल" अशी प्रतिकिया दिली. रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एमएमआरडीएने मोठी कारवाई केली आहे. एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.


मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.


अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले. तसेच मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ॲाडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा