दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा तातडीने शोध घेण्याचे, पोलीस उपायुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार


नायर रुग्णालयातील डॉक्टरांना चिमुकलीवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश


शिवसेनेच्या शायना एनसी यांच्या मागणीची तातडीने घेतली दखल


मुंबई : समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले.


त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दुपारी ३ वाजता गंभीर जखमी अवस्थेत मुलीचा शोध लावला. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती अजूनही अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर कारवाई


ही दुर्दैवी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत कळताच शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित दखल घेत पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी समन्वय साधून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याची काळजी घेतली तसेच पोलीस आयुक्तांशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेला आणि तपासाला प्राधान्य देण्यास सांगितले.


“आपल्या समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक सर्वात असुरक्षितांवर अत्याचार करून सुटतील असे समजतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे शायना एनसी यांनी सांगितले. “परंतु यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊ. या निरपराध दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.”


संबंधित यंत्रणांनी तपासाला गती द्यावी, पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शायना एन सी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते