पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा चित्रपट बघत आहेत. यामुळे ग्लोबल मार्केटमध्येही 'धुरंधर'ची क्रेझ वाढत आहे.


'धुरंधर'मध्ये भारतीय गुप्तहेर पाकिस्तानमध्ये ल्यारी नावाच्या शहरात जातो आणि तिथल्या अंडरवर्ल्डमध्ये चतुराईने प्रवेश करतो. यानंतर तो हुशारीने पाकिस्तानमधील शस्त्रास्त्र तस्करांच्या मोठ्या नेटवर्कची माहिती मिळवतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठार मारतो. चित्रपटात वारंवार भारतीय गुप्तहेर पाकिस्तानमधील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित लोकांची धुलाई करताना दिसतो आहे. ही बाब आता सोशल मीडियामुळे जगजाहीर झाले आहे. वास्तव माहिती असूनही भारतीय चित्रपटाच्या प्रेमापोटी अनेक पाकिस्तानी चित्रपटप्रेमी 'धुरंधर' हा चित्रपट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


ग्राहकांमधील मागणीचा वाढता जोर बघून पाकिस्तानमधील पायरसी अर्थात चित्रपटाची चोरी करणाऱ्यांनी आता 'धुरंधर' हा चित्रपट पेन ड्राईव्हमधून पुरविण्यास सुरुवात केली आहे. दुय्यम दर्जाचा व्हिडीओ मिळाला तरी पाकिस्तानमधील अनेक चित्रपटप्रेमी 'धुरधंर'ची पायरेटेड कॉपी खरेदी करत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये अवघ्या १६ रुपयांत 'धुरधंर'ची पायरेटेड कॉपी पेनड्राईव्हमधून दिली जात आहे.


भारतात याआधीच 'धुरधंर'ने मल्टिप्लेक्समधील शोंच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता भारतात 'धुरधंर' हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर उपलब्ध आहे. 'नेटफ्लिक्स'चे सबस्क्रायबर घरबसल्या 'धुरधंर'चा आनंद लुटत आहेत. एकीकडे घरबसल्या 'धुरधंर' बघणे शक्य असताना पाकिस्तानमध्ये मात्र चित्रपटप्रेमींना 'धुरधंर'च्या पायरेटेड कॉपीवरच समाधान मानावे लागत आहे.


भारतात धुरधंर २ हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे. देशात 'धुरधंर'च्या पुढल्या भागाविषयी तर्कवितर्क जोरात असताना पाकिस्तानमध्ये 'धुरधंर'ची पायरेटेड कॉपी कशी मिळवायची याचीच चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक

Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक

Bigg Boss Marathi 6 : राखी सावंतनं मर्यादा ओलांडल्या, दीपाली आणि राकेशबाबत केलं 'हे' वक्तव्य

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. याचबरोबर घरात राखी सावंतनं एन्ट्री घेतल्यानंतर

Dhurandhar 2 : अखेर 'धुरंधर २' सिनेमाबाबत दीपिकानं सोडलं मौनं, ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली....

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई केली