महापौरांनी गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयाला दिली अचानक भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदी विराजमान होताच मुंबईतील महापालिका रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था वसुधारण्यासाठी मी अचानक महापालिका रुग्णालयांना भेटी देणार असे जाहीर करणाऱ्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी शनिवारी गो एम वंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय अर्थात जुन्या शताब्दी रुग्णालयाला शनिवारी अचानक भेट देत रुग्णांना मिळत असलेल्या उपचाराची आणि आरोग्य सेवेची माहिती घेतली.


गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय अर्थात जुन्या( शताब्दी )रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवारी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी आकस्मिक पाहणी केली. महापौर रितू तावडे यांनी प्रथम अपघात विभाग, त्यानंतरमहिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, पुरुष वैद्यकीय रुग्ण कक्ष, अतिदक्षता कक्षाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर महिला कक्षात पिण्याच्या पाण्याची, बालकांसाठी स्वतंत्र पाळणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच दैनंदिनपणे कक्षाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्याची रुग्णालयांची कार्यपद्धतीही समजावून घेतली. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. चंद्रकांत पवार उपस्थित होते.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका