Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग आली असून, संघटनात्मक पातळीवर व्यापक बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये सन्मानजनक कामगिरी करण्यात अपयश आल्याने राज्यभरातील तब्बल ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.


लोकसभा निवडणुकीत १४ जागा जिंकत काँग्रेसने राज्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसला. परिणामी, संघटना बळकट करण्यावर भर देण्याचा विचार पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २४३ नगरपालिका आणि ४५ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या, तर शेवटच्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले. महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश आले, मात्र चंद्रपूरमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली. परभणीत उबाठाच्या मदतीने उपमहापौरपद मिळवण्यात आले.


१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी प्रभावी ठरली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली, तरी सत्तेपासून दूर राहावे लागले. सांगली जिल्हा परिषदेतही अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले.



हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हान:


मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात तोळामासा झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी व्यापक संघटनात्मक बदल अपरिहार्य आहेत. या पार्श्वभूमीवर ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्यासह जिल्हा कार्यकारिण्यांमध्ये फेरबदल करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या बदलांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे.

Comments
Add Comment

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात

Middle East War : इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; ८९ ठार, इराणचा अमेरिकेला थेट इशारा

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय