Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले हैदराबाद शहर आता एका नवीन विक्रमासाठी सज्ज झाले आहे. हैदराबादच्या क्षितिजावर लवकरच 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर' उभा राहणार असून, हे केवळ हैदराबादचेच नव्हे तर भारतातील सर्वात उंच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ ठरणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या भव्य प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली असून, हा टॉवर तब्बल ४३० फूट उंच असेल. एकदा पूर्ण झाल्यानंतर, हे ठिकाण केवळ भक्तांसाठीच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण केंद्र ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा आधुनिक स्वरूपात जगासमोर मांडला जाणार आहे.



कुतुब मीनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच


इटलीचा 'लिनिंग टॉवर ऑफ पिसा' (१८७ फूट), दिल्लीचा 'कुतुब मीनार' (२४० फूट) आणि न्यूयॉर्कचा 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' (३०५ फूट) या सर्वांना उंचीच्या बाबतीत मागे टाकत, हैदराबादमध्ये ४३० फूट उंच 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर' हे एक वास्तुकलेचे आश्चर्य उभे राहत आहे. हे भव्य स्मारक 'वर्ल्डवाइड हरे कृष्ण चळवळी'चे संस्थापक-आचार्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या दैवी कार्याला समर्पित करण्यात आले आहे. हैदराबादमधील नरसिंगी (Narsingi) भागात सहा एकर विस्तीर्ण जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे.



४३० फूट उंच 'हेरिटेज टॉवर'चा असा असेल थाट!


हैदराबादमध्ये साकारत असलेला 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर' हा केवळ एक गगनचुंबी इमारत नसून, तो भारतीय संस्कृती आणि वारशाचा जिवंत नमुना ठरणार आहे. या भव्य टॉवरच्या मुख्य शिखरावर 'दिव्य सुदर्शन चक्र' बसवण्यात येणार आहे, जे ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या 'नील चक्रा'ची प्रतिकृती असेल. हे सुदर्शन चक्र तांबे, लोखंड, जस्त, शिसे, चांदी, पितळ, पारा आणि सोने या आठ धातूंच्या मिश्रणातून (अष्टधातू) तयार केले जाणार असून, ते शाश्वत रक्षण आणि शक्तीचे प्रतीक मानले जाईल. ज्या भूमीवर कधीकाळी गायीचे वास्तव्य होते, अशा पवित्र भूमीवर हे टॉवर उभे राहत आहे. केवळ मंदिरच नव्हे, तर या परिसरात आश्रम, सुंदर उद्याने, मल्टी-व्हिजन थिएटर, समृद्ध वाचनालय आणि एक भव्य 'भगवद्गीता एक्सपो' देखील असेल. याशिवाय, सांस्कृतिक शिक्षण केंद्रामार्फत येणाऱ्या पिढीला भरतील वर्षाचे धडे सुद्धा दिले जातील.



तिरुपती आणि बृहदीश्वर मंदिराची झलक!


तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उभारले जाणारे 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर' हे केवळ उंचीच नाही, तर आपल्या ऐतिहासिक वास्तुकलेसाठीही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या भव्य संकुलाची रचना दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर आणि तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराच्या प्राचीन स्थापत्यशैलीतून प्रेरणा घेऊन केली जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री सत्य गौरा चंद्र दासा यांनी दिली. "भगवान श्रीकृष्णाचा दैवी संदेश आणि त्यांचे महात्म्य आजच्या आधुनिक समाजाला सहज समजेल आणि पटेल अशा स्वरूपात या केंद्राच्या माध्यमातून मांडले जाणार आहे," असे श्री सत्य गौरा चंद्र दासा यांनी नमूद केले. प्राचीन परंपरा आणि आधुनिक सादरीकरण यांचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने