NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे.


राज्यातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांना जोडणाऱ्या १५४.६३५ किमी. आणि ३३२०.३८ कोटी रुपयांच्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. घोटी-त्र्यंबक-पालघर विभागात मार्ग विस्तार होणार आहे. केंद्राने मार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे राज्यातील औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यास मदत होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग विस्ताराला मिळालेल्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.


नाशिक आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या NH-160A महामार्गाच्या विस्ताराला पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, औद्योगिक वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या