जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना २३ धावांनी जिंकला. हा निकाल पाहून भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रचंड आनंद झाला आहे. याला कारणही विशेष असेच आहे.


झिम्बाब्वेने तब्बल १९ वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. याआधी २००७ च्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्यावेळी भारत जगज्जेता झाला होता. यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झाली आहे. याआधी १९८३ मध्येही (५० ओव्हर) झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यावेळी झिम्बाब्वे १३ धावांनी जिंकली होती. नंतर २००७ मध्ये झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच विकेट राखून जिंकली होती. विशेष म्हणजे २००७ आणि त्याआधी १९८३ मध्येही भारत विश्वविजेता झाला होता. यामुळे आता २०२६ मध्येही भारत विश्वविजेता होणार का ? याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.


झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणी


फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला.


मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोश इंगलिस ८ धावा करून तंबूत परतला. मुझाराबानीने त्याला बाद केले. कॅमेरुन ग्रीनला इव्हान्सने बाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. मुझाराबानीच्या उसळत्या चेंडूवर टीम डेव्हिड भोपळाही न फोडता तंबूत परतला. इव्हान्सने कर्णधार हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था २९/४ अशी केली. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल सामना जिंकून देणार, असे चित्र असताना बर्लच्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. दुखापतीमुळे गोलंदाजी अर्धवट सोडलेला मार्कस स्टॉइनस फलंदाजीला आला. चौकारासह त्याने चांगली सुरुवात केली. मात्र मासाकाटझाने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. स्टॉइनसने ६ धावा केल्या. बेन ड्वारशियसने लगावलेल्या फटक्याचे मुनयोंगाने अफलातून झेलात रुपांतर केले. रेनशॉकडे सूत्रे होती. धावगतीचे आव्हान १५ च्या पलिकडे गेल्यामुळे रेनशॉने धोका पत्करला. मात्र तो रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. रेनशॉ बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. झिम्बाब्वेतर्फे ब्लेसिंग मुझाराबानीने ४ तर ब्रॅड इव्हान्सने ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.


झिम्बाब्वेने ब्रायन बेनेटच्या अर्धशतकाच्या बळावर १६९ धावांची मजल मारली. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्टॉइनसने मारुमानीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ धावा केल्या. रायन बर्लने बेनेटला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केले. त्यानेही ३५ धावा केल्या. यानंतर बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा कुटल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. बेनेटने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत खेळी केली. मात्र २० षटकं खेळूनही त्याच्या नावावर अर्धशतकच असल्याने स्ट्राईकवरून टीकाही झाली. त्याने ११४च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.


झिम्बाब्वेच्या दर्जेदार खेळापुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तर


झिम्बाब्वेने सगळ्या आघाड्यांवर दर्जेदार खेळ करत ऑस्ट्रेलियाला निरुत्तर केले. या विजयासह ब गटाची गुणतालिका रंजक झाली आहे. श्रीलंकेने दोन लढतीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा धुव्वा उडवला मात्र झिम्बाब्वेविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. झिम्बाब्वेने दोन सामने खेळून दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते दुसऱ्या स्थानी आहेत. झिम्बाब्वेने आणखी एक विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. नियमांनुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बादफेरीसाठी पात्र ठरतील.


वनडेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला केले आहे चीतपट


झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

Comments
Add Comment

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२