यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!

नवी दिल्ली  : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना रोमहर्षक राहिला. कॅनडाच्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची गाडी रुळावरून घसरली होती, परंतु आर्यांश शर्मा आणि सोहैब खान यांच्या अर्धशतकी खेळीने यूएईला थरारक विजय मिळवून दिला.



हर्ष ठाकेरने ४१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार मारून ५० धावांची खेळी केली. त्याला नवनीत धलिवाल ( ३४) व श्रेयस मोव्वा ( २१) यांची साथ मिळाली आणि कॅनडाने ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली. जलदगती गोलंदाज जुनैदने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो यूएईचा पहिला गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच विकेट्स घेणारा तो दुसरा संलग्न देशाचा गोलंदाज ठरला. यापूर्वी नेदरलँड्सच्या अहसान मलिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ धावांत ५ बळी टिपले होते.


लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईने ६६ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. साद बिन जाफरने तीन विकेट्स घेतल्या. पण, आर्यांश शर्मा व सोहैब खान यांनी पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या दोन षटकांत यूएईला विजयासाठी १२ चेंडूंत २६ धावांची गरज होती. कलीम सनाने १९व्या षटकात १८ धावा दिल्या आणि सामन्याला कलाटणी मिळाली. शर्माने पहिल्या ४ चेंडूंत ११ धावा जोडल्या आणि त्यानंतर खानने ७ धावा जोडल्या.


२० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून शर्माने यूएईचा विजय पक्का केला. विजयासाठी एक धाव हवी असताना खान बाद झाला. त्याने २९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५१ धावांची खेळी केली. जस्करन सिंगने विजयी धाव घेतली. आर्यांश ५३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावांवर नाबाद राहिला. यूएईने या विजयासह ड गटात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी दोन विजय मिळवून अव्वल दोन क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तानची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आफ्रिकेविरुद्धचा सामना डबल सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा स्पर्धेतील मार्ग खडतर झाला होता. त्यात यूएईच्या विजयाने त्यांना सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे. अफगाणिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत यूएई व कॅनडा यांचा सामना करायचा आहे. त्यांना या दोन्ही लढती जिंकाव्या लागतील आणि त्याचवेळी किवी व आफ्रिका यांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.



झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पाजले पराभवाचे पाणी


फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया केली. झिम्बाब्वेने कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने सर्वांगीण सुरेख खेळ करत ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ ठरवले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांची मजल मारली. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावांतच आटोपला. झिम्बाब्वेने २३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३३ लढतींपैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. १९८३ वनडे वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने १३ धावांनी थरारक विजय मिळवला होता. २०१४ आणि अगदी अलीकडे म्हणजे २०२२ मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.

Comments
Add Comment

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२