टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.


भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसरे स्थान पटकावले आहे.


नेदरलँडने नामिबिया विरुद्धचा सामना सात विकेट राखून जिंकल्यामुळे ते दोन गुण आणि +०.३५६ च्या नेट रनरेटसह गटात तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिका शून्य गुण आणि -१.५२५ च्या नेट रनरेटसह गटात चौथ्या स्थानी तर नामिबिया शून्य गुण आणि -२.८८४ च्या नेट रनरेटसह गटात पाचव्या स्थानी आहे.


भारताचा रविवार १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे. नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात भारत जिंकण्याची शक्यता गृहित धरली तरी गटातले अव्वल स्थान राखण्यासाठी आणि सुपर ८ फेरीकरिता लिलया पात्र होण्यासाठी भारताला पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. यामुळेच पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे.


आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत १२ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने भारताचा ३ वेळा पराभव केला आहे. फक्त एकदाच भारत - पाकिस्तान दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. यामुळे रविवारच्या सामन्याआधीच भारताचे पारडे जड असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पण सामना होण्याआधीच हवामान विभागाने पावसाचे भाकीत वर्तविल्यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.


श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! टी20 वर्ल्ड कप तिकीट काळाबाजारप्रकरणी माजी क्रिकेटपटूसह ६ जणांना अटक

मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20

IPL 2026 : हंगामाच्या मध्यावर सनरायझर्सला मिळणार पॅट कमिन्सची साथ ?

मुंबई : आयपीएल २०२६ च्या आधी पॅट कमिन्सबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू

Team India's Match Schedule : क्रिकेटचा मेगा सीझन! बीसीसीआयकडून भारतीय संघाचं २०२६-२७ चं वेळापत्रक जाहीर

- वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत थरारक मालिकांची मेजवानी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२