Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या प्रकारच्या चौकशीत माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन", अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवाळ ?


नरहरी झिरवाळ यावेळी दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध आढळला तर राजीनामा देणार असं जाहीर केलं आहे. तसंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळून लावले. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


"मी तर परवापासून येथे आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीते पेपर बनवण्याचं काम ते करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. त्याला जाब द्यावा लागणार आहे," असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.



नेमकं प्रकरण काय ?


अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

Comments
Add Comment

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.