राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्ताव


राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.


याबाबत दुबे यांनी सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. या प्रस्तावात मागणी केली आहे की या प्रकरणावर चर्चा व्हावी, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावावा. दुबे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस नाही. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असून, गांधींचे संसदेतून निलंबन करण्याची मागणी त्यात केली आहे. राहुल गांधी जॉर्ज सोरोससारख्या बाह्य शक्तींच्या पाठिंब्याने देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.


दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करू शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची ऊर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो.अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरले होते.

Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ