लोणावळातील लायन्स पॉइंट परिसरात पुन्हा आढळला मृतदेह; पोलिस तपास सुरू

लोणावळा : पुण्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण हेच ठिकाण सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हादरून गेले आहे. मागे मुंबईतील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि आता लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंह (३४) असं मृत तरुणाचं नाव असून तो आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटे ४: ३० च्या सुमारास लायन्स पॉइंटजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहन चालकाचा शोध घेतला असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे पोलिसांनी गाडी तपासली त्यात संबंधित मृत व्यक्तीचा फोन सापडला. वीरेंद्र याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोला आणि जवळच्या व्यक्तींना ई-मेल आणि मेसेजद्वारे आपण आत्महत्या करणार आहोत याचे संकेत दिले होते. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला.



स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली


पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेहाचा दरीत शोध घेतला. ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्याच दिशेने २५० फूट खोल दरीत संबंधित व्यक्ती आढळून आली. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिक कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.


आठवड्याभरात ही दुसरी धक्कादायक घटना घडली त्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे मृत्यूचं ठिकाण तर बनणार नाही ना? याविषयी स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरात घडलेल्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अश्याच घटना सर्रास घडत असतील तर पर्यटनस्थळांवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.



Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका